Friday, January 14, 2022

आले कोरोनाच्या मना...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आले कोरोनाच्या मना...

विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद,
ऑनलाइन वर्ग सुरू झाले.
शिक्षकांसाठी शाळा चालू,
ते तर ऑनलाईन गुरु झाले.

काही चालू,काही बंद आहे,
जिथे जशी जशी संधी आहे.
कुठे कुठे संचारबंदी तर,
कुठे कुठे जमावबंदी आहे.

काही नियम अधिक कडक,
काही नियम मात्र ढिले झाले !
कोरोनाच्या मार्केटिंगसाठी,
सगळे जग पुन्हा खुले झाले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6378
दैनिक पुण्यनगरी
14जानेवारी 2022

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...