Sunday, January 16, 2022

पापाचा घडा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पापाचा घडा

पापाचा घडा कुणाचाही असो,
तो फुटल्याशिवाय रहात नाही.
थोड्याफार पुण्याईचाही,
तो हिशोब-बिशोब पहात नाही.

ज्याचा भरला जातो धडा,
तो लफंगा आणि लुच्चाअसतो !
पापी कितीही डांबरट असो,
पापाचा घडा मात्र कच्चा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7817
दैनिक झुंजार नेता
16जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...