Tuesday, January 4, 2022

भाडोत्री प्रबोधन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

भाडोत्री प्रबोधन

भाषण ठोका,टाळ्या मिळवा,
अंगावरती जाकीट लागते.
प्रबोधनाच्या नावाखाली,
भलेमोठे पाकीट लागते.

प्रबोधनाचा बाजार झाला,
प्रबोधन हा आजार झाला.
पुढे जातोय की मागे?
समाजसुद्धा बेजार झाला.

जाकीट आणि पाकिटावर,
प्रबोधनाचा दर्जा आहे !
त्यांचे झकास चाललेय,
ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6372
दैनिक पुण्यनगरी
4जानेवारी 2022

 

1 comment:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...