Tuesday, January 18, 2022

शाळा भरवा !....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

शाळा भरवा !

विरोधक म्हणू लागले,
शाळा भरव, शाळा भरवा.
सत्ताधारीही कण्हू लागले,
शाळा भरवा,शाळा भरवा.

कांड्या करणारे म्हणू लागले,
शाळा भरव, शाळा भरवा.
दांड्या मारणारेही म्हणू लागले,
शाळा भरवा,शाळा भरवा.

चालक-मालक म्हणू लागले,
शाळा भरव, शाळा भरवा.
वैतागलेले पालक म्हणू लागले,
शाळा भरवा, शाळा भरवा.

तज्ञ आणि अज्ञ म्हणू लागले,
शाळा भरव, शाळा भरवा.
संघटनांचेही इशारे आले,
शाळा भरवा, शाळा भरवा.

यांचा पुरवा,त्यांचा पुरवा,
आग्रह आणि दुराग्रह पुरवा.
टायमिंग साधा,विद्यार्थ्यांना बाधा,
शाळा भरवा, शाळा भरवा.

वैतागून कोरोना म्हणाला,
आधी तुम्ही जिंका,मला हरवा !
मग मीसुद्धा आंदोलन करील,
शाळा भरवा, शाळा भरवा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6382
दैनिक पुण्यनगरी
18जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...