Monday, January 17, 2022

उथळे आणि पुतळे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

उथळे आणि पुतळे

त्यांचा हटवा,आमचा बसवा,
असे पुतळ्यांचे राजकारण असते.
सवंग आणि उथळ,
असे उथळ्यांचे राजकारण असते.

पुतळ्यांना उथळे हवे असतात,
उथळ्यांना पुतळे हवे असतात !
राजकीय आणि सामाजिकसह,
इतिहासाचे कोथळे हवे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7818
दैनिक झुंजार नेता
17जानेवारी 2022
-----------------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...