Saturday, January 15, 2022

ऑर्डर ऑर्डर..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ऑर्डर ऑर्डर

मोठ्या अक्षरात रंगणार,
दुकानावरच्या पाट्या.
अ,आ,ई म्हणाले,
ए.बी.सी.डी.ला,
आता बसा खेळत गोट्या.

इंग्रजी आणि मराठीत,
अस्मितेची बॉर्डर आहे !
मराठीच्या बोल्डपणामागे,
कोर्टाची ऑर्डर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7816
दैनिक झुंजार नेता
15जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...