Saturday, January 8, 2022

कोरोनास्तुती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

कोरोनास्तुती

कोरोनाची चित आहे,
कोरोनाचीच पट आहे.
कोरोना जसा खट आहे,
तसा कोरोना नट आहे.

त्याची लस नकली आहे,
त्याचे प्रमाणपत्र नकली आहे.
कोरोनाच्या साथीमध्ये,
अक्कलसुद्धा विकली आहे.

कोरोना म्हणजे षडयंत्र,
कारोना म्हणजे स्टंट आहे !
कोरोनी एवढा चवचाल की,
व्हेरीएंट मागे व्हेरीएंट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7809
दैनिक झुंजार नेता
8जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...