Monday, January 17, 2022

उल्कापिंड कोसळणार !... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

उल्कापिंड कोसळणार !

बायको म्हणाली नवऱ्याला,
तुमचाही गोंधळ उसळणार आहे
ऑफिसात छत्री-बित्री घेऊन जा,
आज उल्कापिंड कोसळणार आहे.

जगाच्या अंताची वेळ आली,
उगीच अशी भांडू-बिंडू नकोस.
हेल्मेट-बिल्मेट घातल्याशिवाय,
तूही कॉलनीमध्ये हिंडू नकोस.

शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू,
त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे !
माणसं जवळ येण्यासाठी तरी,
जगबुडीची बातमी आली पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6381
दैनिक पुण्यनगरी
17जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...