Sunday, January 30, 2022

मास्क मुक्ती.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मास्क मुक्ती

कुणी केले सावध स्वागत,
कुणाकडून रेवड्या आहेत.
ज्याच्या त्याच्या तोंडी,
मास्क मुक्तीच्या वावड्या आहेत.

मास्कमुक्तीचा निर्णय,
विचारपूर्वकच घ्यावा लागेल!
दंड भरलेल्या लोकांना,
तो व्याजासह परत द्यावा लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7830
दैनिक झुंजार नेता
30जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...