Monday, January 24, 2022

भांडवली लोकशाही...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

भांडवली लोकशाही

ज्यांच्याकडे आहे भांडवल,
त्यांनाच विजयाची ग्वाही आहे.
राज्यशास्त्राच्या भाषेत,
ही भांडवली लोकशाही आहे.

जात,धर्म,भाषा आणि प्रांत,
हे भांडवल तर खूप जुने आहे!
भांडवलशाहीच्या तालावर,
आपल्या लोकशाहीचे गाणे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6388
दैनिक पुण्यनगरी
24जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...