Wednesday, January 26, 2022

सजासत्ताक राज्य.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सजासत्ताक राज्य

कुणासाठी सजासत्ताक आहे,
कुणासाठी मजासत्ताक आहे.
थोडक्यात काय तर?
असेच आपले प्रजासत्ताक आहे.

हे राज्य म्हणे प्रजेचे आहे,
हे राज्य मोठ्या मजेचे आहे !
लोकांनी लोकांना दिलेल्या,
हे राज्य लोकशाही सजेचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7827
दैनिक झुंजार नेता
26जानेवारी 2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...