Friday, January 28, 2022

आट्या - पाट्या.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आट्या - पाट्या

कुणी पूज्य,कुणी अपूज्य,
कुणावर कशी वेळ आहे?
खेळाच्या मैदानावर,
आट्या-पाट्याचा खेळ आहे.

आपण गोट्या खेळतो म्हणून,
त्यांच्या आट्यापाट्या रंगतात !
सगळे राजकीय इतिहास,
बदललेल्या पाट्या सांगतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6390
दैनिक पुण्यनगरी
28जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...