आजची वात्रटिका
--------------------
वित्तं बातमी
काही बातम्या दाबल्या जातात,
काही बातम्या पेरल्या जातात.
दाबून दाबून फोडल्या की,
त्या वादग्रस्त ठरल्या जातात.
बातम्या दाबणाऱ्याही टीम आहेत,
बातम्या पेरणाऱ्याही टीम आहेत.
ज्याचे त्याचे वेगवेगळे पॅकेज,
ज्याच्या त्याच्या वेगळ्या स्कीम आहेत.
टीम आणि स्कीम वरतीच,
बातम्यांची सगळी मदार असते !
सगळे रोखठोक वाटले तरी,
बातम्यांची पेरणी उधार असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9462
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment