Thursday, November 19, 2026

ज्याचा त्याचा मुक्ती दिन... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

ज्याचा त्याचा
मुक्ती दिन

तिलाही मुक्त होता येणार नाही,
त्यालाही मुक्त होता येणार नाही. 
आपापले दिन साजरे करून, 
हात झटकीत जाता येणार नाही. 

कोणतीच टाळी कधी, 
एका हाताने वाजली जात नाही.
एकमेकांवर कुरघोडी केल्याने,
मुक्ती काही मोजली जात नाही.

चार दोन अपवादाला, 
कुणीही नियम बनवू नका !
स्त्रीमुक्ती असो वा पुरुषमुक्ती,
टिंगल टवाळीने हिणवू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका 
वर्ष सहावे
अंक 101 वा 
19 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा 
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

No comments:

इशाराही काफी है... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- इशाराही काफी है दहशतवादाचा अर्थ, सोसणारालाच कळू शकतो.  दहशतवादाचा राक्षस, पोसणारालाही गिळ...