Friday, November 20, 2026

डबल गेम... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

डबल गेम

पक्षांतर आणि पक्ष प्रवेश,
दोन्हीही एक आहे.
तरीही वेगळे मानले जातात,
हाच खरा जोक आहे.

पक्षांतराशिवाय पक्ष प्रवेश,
कधी सुध्दा शक्य नाही ! 
हे राजकीय वास्तव आहे,
हे टाळीचे वाक्य नाही!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4266
दै.झुंजार नेता
20 नोव्हेंबर 2011

No comments:

इशाराही काफी है... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- इशाराही काफी है दहशतवादाचा अर्थ, सोसणारालाच कळू शकतो.  दहशतवादाचा राक्षस, पोसणारालाही गिळ...