Monday, January 10, 2022

सत्य मार्ग..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सत्य मार्ग

शिंकणारे खूप आहेत,
थुंकणारे खूप आहेत.
तुमच्या चांगल्या कामावर,
भुंकणाते खूप आहेत.

त्यांना शिंकू द्या, थुंकू द्या,
भुंकणाऱ्यांना भुंकू द्या,
पराभवाला जिंकणे समजतात,
त्यांना खुशाल जिंकू द्या !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7811
दैनिक झुंजार नेता
10जानेवारी 2022

 

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...