Saturday, January 22, 2022

इमानदार गुरुजींनो.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इमानदार गुरुजींनो....

ग्लोबल वा इंटरनॅशनल असोत,
तुम्ही डिसले असोत वा वारे.
इथे सब घोडे बारा टक्के,
तुम्ही लोकल समजून घ्या रे.

हा साने गुरुजींचा काळ नाही,
हा नाणे गुरुजींचा काळ आहे.
इथे वेश्येला मणीहार तर,
पतिव्रतेवरती मात्र आळ आहे.

चाकोरी सोडू नका,
चाकोरी मोडू नका,
नसता त्याचेही मोल आहेत !
सिस्टीम ही सिस्टीम असते,
आमचे अनुभवाचे बोल आहेत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6386
दैनिक पुण्यनगरी
22जानेवारी 2022

 

2 comments:

Unknown said...

संत्य आहे.....
चलती का नाम गाडी
पुढे पुढे करतात हाजी

Unknown said...

कोट्यवधीचे अपहार झाकले जातात मात्र वारे सारख्या ध्येयवेड्याला बळीचा बकरा बनविला जातो .दिसले गुरुजींना नाहक त्रास सहन करायला लागत आहे .

दैनिक वात्रटिका6मे2024....वर्ष- तिसरे..अंक -3334वा

दैनिक वात्रटिका 6मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -3334वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1WSxYXp3pJLhh-mSC3cjaoRYkm...