Saturday, November 21, 2026

नामी उपाय... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

नामी उपाय

ती नाही तर ही आपली होईल,
आशा खूपच वेडी असते. 
मुलगी दिसली रे दिसली की, 
मुलांकडून छेडाछेडी असते.

किमान जनाची लाज बाळगून,
तरी हा प्रकार सोडला पाहिजे! 
रडत आणि कुढत बसण्यापेक्षा,
कानामागे जाळ काढला पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2785
दैनिक पुण्यनगरी
21 नोव्हेंबर 2011

No comments:

डी.टी.एच्.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -----------------------  डी.टी.एच्. दूरदर्शन वाहिन्या, आता डायरेक्ट घरात आल्या, नेमक्या झाकायच्याच गोष्टी, घराघरा...