Saturday, November 21, 2026

आधुनिक माकडचाळे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

आधुनिक माकडचाळे

अशी ही बनवाबनवी, 
हेच ए.आय.चे फलित आहे.
सोशल मीडिया म्हणजे, 
माकडांच्या हाती कोलीत आहे.

एकमेकांसमोर नाक खाजवण्यात
माकडांना भलतीच मौज आहे.
इथल्या प्रत्येक मदाऱ्यांकडे,
माकडांची फौजच फौज आहे.

माकडांना पक्की खात्री पटली,
सोशल मीडिया हे मायाजाल आहे !
आपलीच लाल म्हणीत,
माकडांचा एक सूर एक ताल आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9463
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
21 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा 
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

No comments:

डी.टी.एच्.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -----------------------  डी.टी.एच्. दूरदर्शन वाहिन्या, आता डायरेक्ट घरात आल्या, नेमक्या झाकायच्याच गोष्टी, घराघरा...