आजची वात्रटिका
--------------------
दिलासा
घाबरू नकोस बाळा,
प्रत्येक प्रश्नाला उत्तर.
2026 ला म्हणाले,
एकोणीसशे बाहत्तर.
माझ्यासारखा दिलासा,
2027 ला देत रहा.
दुष्काळालाही सांग,
तुला यायचे तर येत रहा.
कंबर कसू ;हिंमत बांधू,
यंदा चुकला जरी पेरा !
संकटांचीही संधी करू,
हाच आपला सात बारा !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 103 वा
21 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment