आजची वात्रटिका
--------------------
आनंदी आनंद
पुरेसा पाऊस झाला तरच,
धरणात पाण्याची साठवण होते.
हे सांगायची गरजच नाही,
धरणाला कुणाची आठवण येते?
पाणी आडवा;पाणी जिरवा,
योजनेचाही आनंदी आनंद आहे!
खंडीचे वरण दिसले की,
ज्याला त्याला नको तो छंद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 104 वा
22 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment