Sunday, November 22, 2026

कार्यकर्त्यांची चर्चा.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका




आजची वात्रटिका
--------------------

कार्यकर्त्यांची चर्चा

बदलत्या राजकारणाचे,
बघा कसले गोते आहेत ?
काल वेगळे;आज वेगळे,
आपल्या सर्वांचे नेते आहेत.

नेत्यांच्या सत्ताकारणाचा,
उठता बसता निचरा आहे.
नेत्यांच्या राजकीय स्वप्नापुढे,
आपल्या सर्वांचा कचरा आहे.

नेत्यांच्या बदलत्या रंगांपुढे,
सरड्यांचे रंगही फिक्के आहेत !
तुमच्या आमच्या कपाळी,
बदनामीचे नवे शिक्के आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9464
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
22 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा


No comments:

आनंदी आनंद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आनंदी आनंद पुरेसा पाऊस झाला तरच,  धरणात पाण्याची साठवण होते. हे सांगायची गरजच नाही,  धरणाला ...