आजची वात्रटिका
--------------------------
कुलदिपकांचे टेंभे
आपल्या बोला-बोलीत,
बापजाद्यांचे नाव घेवू लागले.
राजकीय कुलदिपक,
नसते टेंभे लावू लागले.
नको तसा; नको तो,
परस्परांवर आळ आहे!
राजकीय कुलदिपकांच्या टेंभ्यांचा,
जिकडे तिकडे जाळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4268
दै.झुंजार नेता
22 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment