आजची वात्रटिका
-----------------------
पोपटी विचारवंत
समोर एक, मागे एक,
बोलण्याचे धंदे असतात.
पोपटी विचारवंत,
सत्ताधाऱ्यांचे मिंधे असतात.
त्यांनी मांडलेले विचार म्हणजे,
बाष्कळ पोपटपंची असते !
पुरस्कार आणि पदांएवढीच,
त्यांची वैचारिक उंची असते !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-2814
दैनिक पुण्यनगरी
9 जानेवारी 2011
No comments:
Post a Comment