Monday, November 23, 2026

मनसेचे मूल्यमापन.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

मनसेचे मूल्यमापन

मनसेच्या परीक्षा निर्णयाचे,
दिलसे स्वागत व्हायला हवे.. 
उमेदवारांच्या परीक्षा प्रयोगाला,
 प्रोत्साहन द्यायला हवे.

सेनेच्या नवनिर्माणाचे,
एवढे तरी मूल्य स्थापन व्हावे ! 
स्टंट म्हणून परीक्षा नको,
त्यातून खरे मूल्यमापन व्हावे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4269
दै.झुंजार नेता
23 नोव्हेंबर 2011

No comments:

पोपटी विचारवंत... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- पोपटी विचारवंत समोर एक, मागे एक, बोलण्याचे धंदे असतात.  पोपटी विचारवंत, सत्ताधाऱ्यांचे मि...