आजची वात्रटिका
--------------------
विनोदी मागण्या
आपल्या सहिष्णुतेच्या पातळीने,
अजून नेमके किती खाली यावे ?
फिरून फिरून पुन्हा वाद होतात,
कुणी काय खावे? कुणी काय प्यावे?
कोण काय खातो? कोण काय पितो?
आक्षेप नको कोण काय घालतो आहे?
धर्म संस्कृतीचा तथाकथित ठेकेदार,
उठसूट बंदीचीच भाषा बोलतो आहे.
आमचा काही कुणा एकाकडे,
बोलण्याचा अजिबात रोख नाही !
उगीच नाक मुरडत बसायला,
हा काही आमचा नॉनव्हेज जोक नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9467
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 नोव्हेंबर 2026
-------------------------------
फेरफटका- 9466
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment