Wednesday, November 25, 2026

संतापाची उकल... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संतापाची उकल

आघाड्यांच्या राजकारणात,
जबाबदारीपासून पळता येते.
एकटेच जबाबदार नाही म्हणत,
जबाबदारी टाळता येते.

प्रश्न कोणताही असो,
त्याची चालढकल असते !
सामाजिक संतापाची,
निष्काळजीपणा ही उकल असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2789
दैनिक पुण्यनगरी
25 नोव्हेंबर 2011

No comments:

हल्ल्यांचे फॅड.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- हल्ल्यांचे फॅड राजकारण्यांवरील हले, हे घातक फॅड आहे. हल्ला कोणताही असो, तो तर भ्याड आह...