Wednesday, November 25, 2026

अधिक्रमण... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

अधिक्रमण

चंद्रानंतर शुक्राच्या,
चांदणीने सूर्यालाही गाठले.
१२२ वर्षाच्या प्रतिक्षेचे फळ,
अखेर तिला भेटले.

ती फक्त समोरुन गेली तर,
पृथ्वीने गहजब माजविला.
 'पृथ्वीच्या प्रेम गीता' चा,
पारगमणाने बेंडबाजा वाजविला.

मग तिने हे अधिक्रमण,
उघड्या डोळ्यांनी पाहू दिले नाही ! 
आभाळ भरून आले तरी,
पाणी वाहू दिले नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
फेरफटका-1581
दैनिक झुंजार नेता 
9 जून 2004

No comments:

अधिक्रमण... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- अधिक्रमण चंद्रानंतर शुक्राच्या, चांदणीने सूर्यालाही गाठले. १२२ वर्षाच्या प्रतिक्षेचे फळ, ...