Friday, November 27, 2026

मुडदेबाजी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका



आजची वात्रटिका
-----------------------

मुडदेबाजी

सगळे अनिष्ट प्रकार,
निवडणूक काळातच घडले जातात.
लोकशाहीचे मुडद्यावर मुडदे,
निवडणूक काळातच पाडले जातात.

हे उघड्या डोळ्यांनी बघणारेही,
जिवंत मुडदे असतात ! 
गुन्हेगारांच्या गुन्ह्यावर,
पडद्यावर पडदे असतात!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-2815
दैनिक पुण्यनगरी
10 जानेवारी 2012

No comments:

मुडदेबाजी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- मुडदेबाजी सगळे अनिष्ट प्रकार, निवडणूक काळातच घडले जातात. लोकशाहीचे मुडद्यावर मुडदे, निवडण...