आजची वात्रटिका
-------------------------
पुनर्प्रवेश
पक्षांतर ते पुनर्प्रवेश,
मजेदार राजकीय प्रवास असतो.
पश्चात्तापाच्या भावनेचा,
केवळ प्रासंगिक भास असतो.
पक्षीय पुनर्प्रवेश म्हणजे,
देणारा-घेणाराची मजबुरी असते !
नाराजीची छटा मात्र
ज्याच्या-त्याच्या ऊरी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2792
दैनिक पुण्यनगरी
28नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment