आजची वात्रटिका
-------------------------
भांडवली धोरण
भांडवलासाठी मुद्दा पाहिजे,
शेतकऱ्यांचे कुणाला पडले आहे?
शेतकऱ्यांसाठी लढावे म्हणून,
कुठे कुणाचे घोडे अडले आहे?
ते स्वतःसाठी लढत आहेत,
शेतकऱ्यांसाठी लढत नाहीत !
सत्तेवर कुणीही असोत,
शेतकऱ्यांना पिळायचे सोडत नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2793
दैनिक पुण्यनगरी
29 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment