आजची वात्रटिका
--------------------
मतदारसंघ पुनर्रचना
लोकसंख्येच्या प्रमाणात,
मतदारसंघ वाढवू लागले.
भविष्याचा वेध घेत घेत,
आपले डोके लढवू लागले.
कळतंय पण वळत नाही,
वळतय पण कळत नाही.
तडजोडी केल्याशिवाय,
कोणतेच गणित जुळत नाही.
जसा कुणाचा सकार आहे,
तसा कुणाचा नकार आहे !
भावी पिढ्यांच्या सोयीसाठी,
कुणाचा आनंदाने स्वीकार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9471
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment