Sunday, October 3, 2021

गांधी द्वेष..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गांधी द्वेष

मरणानंतर वैर संपते,
इथे मात्र वैर शेष आहे.
पुन्हा पुन्हा जागृत होतो,
तो तर 'गांधीद्वेष' आहे.

कुणी बरळला जातो आहे,
कुणी गरळला जातो आहे.
द्वेषाने द्वेष वाढून,
कुणी हुरळला जातो आहे

विश्लेषण व्हावे,टीका व्हावी,
टवाळकी आणि टिंगल नको !
शांततेचा मंत्र जपत,
पुन्हा वैचारिक दंगल नको !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6281
दैनिक पुण्यनगरी
3ऑक्टोबर 202

 

1 comment:

Suraj said...

खूप छान वात्रटिका सर

You are great

मळकट आणि जळकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- मळकट आणि जळकट उमेदवारांचे हात बळकट करा, मळकट हात ओरडायला लागले. उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा, कळकट...